आरोग्यबार्शीमहाराष्ट्रशिबीर

मालवंडी येथे मोफत सर्वरोग निदान व औषध वाटप शिबिराचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : मालवंडी, ता. बार्शी : डॉ. राहुल मांजरे पाटील यांच्या सायन्सजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, बार्शी तसेच अमर मेडिकल, मालवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने मालवंडी येथे भव्य सर्वरोग निदान शिबिर, आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.500000मालवंडी येथील अमर मेडिकलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून परिसरातील नागरिकांना याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.5000हे शिबिर रविवार, दि. २९ जून २०२५ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे ठिकाण शिवसेना गेटसमोर, अमर मेडिकल, मालवंडी असे आहे.5000

या शिबिरामध्ये विविध आजारांचे निदान, आरोग्य तपासणी तसेच आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वाटप करण्यात येणार आहे. गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. आयोजक : अमर मेडिकल, समस्त ग्रामस्थ मालवंडी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button