बार्शीत नवोदय व सैनिक स्कूल प्रवेशासाठी ‘सह्याद्री स्पर्धा परीक्षा हब’ची सुवर्णसंधी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : नवोदय विद्यालय व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची दर्जेदार तयारी करून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या उद्देशाने बार्शी येथे ‘सह्याद्री स्पर्धा परीक्षा हब’ सुरू करण्यात आले आहे. इयत्ता ३ री ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग सुरू असून, प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
या उपक्रमाच्या संचालिका सौ. ज्योती चव्हाण (B.A.D.Ed., CTET, Yoga Teacher Diploma) असून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, स्पर्धा परीक्षांची सखोल तयारी करणे आणि शिस्तबद्ध अभ्यासाची सवय लावणे यावर भर दिला जाणार आहे.
संस्थेत विद्यार्थ्यांना दररोज स्पर्धा परीक्षा मासिके, IAS Planner, राजमुद्रा, स्टील फ्रेम यांसह विविध वर्तमानपत्रांचे वाचन करून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, इंडियन एक्सप्रेस, द हिंदू यांसारख्या वृत्तपत्रांचे नियमित वाचन करून निरीक्षण क्षमता विकसित केली जाणार आहे.
याशिवाय परीक्षेपूर्वी पूर्ण वेळ विशेष वर्ग, प्रत्येक घटकावरील चाचण्या, पालकांच्या मोबाईलवर गुणांची माहिती, नवोदय व सैनिक स्कूलसाठी १०० पेक्षा अधिक सराव चाचण्या, योग व आहारशास्त्र विषयक मार्गदर्शन आणि दर महिन्याला पालक बैठक असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
नियमित बॅच १५ जूनपासून सुरू झाली असून २०२६-२७ प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
पत्ता : सय्यद बंगला, भगवंत लॉन्स शेजारी, अलिपुर रोड, बार्शी.
संपर्क :
📞 9922792577
📞 9309247223
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.




