प्रशासनमहाराष्ट्रमुंबई

गुटखा माफियांविरुद्ध एफडीएचा मोठा दणका; आता थेट मकोका अंतर्गत कारवाई

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

मुंबई, दि. 13 : अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध व्यापाराविरोधात कठोर भूमिका घेत मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाल्याची बेकायदेशीर विक्री, साठवणूक, वाहतूक अथवा वितरण आढळल्यास संबंधितांवर थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यात गुटखा बंदी असतानाही काही ठिकाणी अवैधरीत्या उत्पादन, साठवणूक व विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर अशा अवैध व्यवसायात सहभागी असलेल्या टोळ्या व रॅकेटविरोधात अधिक प्रभावी कारवाई करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.5000एफडीए, पोलीस विभाग आणि संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून गुटखा माफियांवर कठोर कारवाई करावी, तसेच अवैध व्यापाराचे आर्थिक नेटवर्क उद्ध्वस्त करण्यावर भर द्यावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील गुटखा आणि निकोटीनयुक्त पदार्थांच्या अवैध व्यापारात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली असून, येत्या काळात मोठ्या प्रमाणावर धाडी आणि कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button