महाराष्ट्रशिबीरसोलापूर

दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचे आयोजन.!

विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस होणार साजरा.

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

सांगोला : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, तरुण तडफदार युवा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांगोला तालुक्याचे पाणीदार माजी. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते युवा सेना तालुकाप्रमुख दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत विविध सामाजिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.

दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि.१५ जून रोजी समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.5000रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमही राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतून समाजात सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे हे विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत असून सोमवार १५ जून रोजी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रसंगी शिवसेनेचे फायर ब्रँड नेते तथा सांगोला तालुक्याचे पाणीदार मा.आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक व नागरिक उपस्थित राहणार असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन गुंडादादा खटकाळे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button