महाराष्ट्रसोलापूर

मोहोळ तालुक्यातील पाटकुळ येथे पोस्ट कार्यालय सुरू करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील पाटकुळ गावात पोस्ट कार्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर विभागाच्या वरिष्ठ टपाल अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

खासदार प्रणिती शिंदे यांनी पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पाटकुळ हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून परिसरातील नागरिकांना टपाल सेवा, बचत योजना, आधार संलग्न सेवा, ज्येष्ठ नागरिकांचे व्यवहार, शासकीय पत्रव्यवहार तसेच इतर विविध टपाल सेवांसाठी दूरवर जावे लागते. त्यामुळे ग्रामस्थांना वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे.5000गावात पोस्ट कार्यालय सुरू झाल्यास नागरिकांना सर्व टपाल सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील. तसेच शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन कामकाजात मोठी सोय होणार असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

डिजिटल इंडिया आणि वित्तीय समावेशनाच्या दृष्टीनेही पाटकुळ येथे पोस्ट कार्यालय सुरू करणे उपयुक्त ठरणार असल्याचे खासदार शिंदे यांनी नमूद केले. यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देऊन पोस्ट कार्यालय सुरू करण्याबाबत रितसर कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी टपाल विभागाकडे केली आहे.5009

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button