दिनबार्शीमहाराष्ट्र

पर्यावरण दिनानिमित्त बार्शी तालुका पोलिसांकडून वृक्षारोपण

कोरफळे येथे पोलिसांसह युवकांचा वृक्षसंवर्धन संकल्प

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने कोरफळे गावातील फायर बट परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. माननीय पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात स्थानिक ग्रामस्थ, युवक, पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण तसेच ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.

उपलब्ध जागेमध्ये विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाबरोबरच लावलेली झाडे भविष्यात टिकून राहावीत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी स्थानिक युवकांनी स्वीकारली.509महाराष्ट्रयावेळी पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला. पोलीस मित्रांनी गावातील शांतता, सुव्यवस्था व सुरक्षितता राखण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले.

कार्यक्रमात बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, कर्मचारी, ग्रामस्थ व युवक उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.5900

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button