प्रशासनमहाराष्ट्रसोलापूर

प्रतिबंधित अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई , सोलापूरात रु.1.21 लाखांचा साठा जप्त

नागरिकांनी अशा प्रकारच्या तक्रारींसाठी विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800-222-2365 वर संपर्क साधावा

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर : अन्न व औषध प्रशासन सोलापूर कार्यालयाने दि.25 मे ते दि.29 मे 2026 या कालावधीत विशेष मोहीम राबवून गुटखा, पानमसाला, मावा यांसारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांविरुद्ध धडक कारवाई केली. या मोहिमेत एकूण 6 कारवाया करण्यात आल्या असून रु.1,21,372/- किमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच 6 इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 273, 274 व अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 कलम 26, 27, 30 व 59 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिली.500कारवाईदरम्यान एक वाहन (किंमत रु.50,000/-) जप्त करण्यात आले असून 5 आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुणे विभागाचे सह आयुक्त श्री. भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही मोहीम राबवली.
देसाई यांनी स्पष्ट केले आहे की, यापुढेही प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणूक वा वाहतूक निदर्शनास आल्यास कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा प्रकारच्या तक्रारींसाठी विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800-222-2365 वर संपर्क साधावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button