पुरस्कारमहाराष्ट्रसोलापूर

मानेगावचे सुरज पाटील यांना साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

माढा : धाराशिव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या 32 व्या संमेलनात माढा तालुक्यातील मानेगावचे युवा उद्योजक सुरज निलकंठ पाटील यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा महात्मा फुले राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार- 2026 संमेलनाध्यक्ष डॉ. नंदकुमार राऊत यांच्या हस्ते व स्वागताध्यक्ष आमदार कैलास घाडगे-पाटील,शिक्षक आमदार विक्रम काळे व परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष निमंत्रक साहित्यिक डॉ.शरद गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मृतिचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देऊन प्रदान करण्यात आला.5000मानेगावचे सुपुत्र सुरज पाटील हे केमिस्ट्री विषयातून एमएससी पदवीधारक आहेत. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेतीत नवनवीन प्रयोग करून ऊस, द्राक्षे, टोमॅटो, झेंडू, कांदे, सोयाबीन, उडीद, तूर आदींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले. शेतकऱ्यांकडील तूर, हरभरा, उडीद हमीभावाने खरेदी करण्यासाठी कृषीसखा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी सुरू केलेली आहे.शेतकऱ्यांकडील बेदाण्याचे नेटिंग, ग्रेडिंग व आकर्षक पॅकिंग करण्यासाठी कृषीसखा फार्मर्स बेदाणा नेटिंग व ग्रेडिंग उद्योगाची उभारणी केली आहे.या दोन्ही उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य दरात सेवा तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे काम ते करीत आहेत.5000कृषी क्षेत्रातील बदल, प्रयोग व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी ते वेळोवेळी कृषी तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात.त्याच्या या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना या मानाच्या राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.ते मानेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक निलकंठ (बापू) पाटील यांचे सुपुत्र आहेत.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.5000यावेळी साहित्य परिषदेचे विश्वस्त चेअरमन अनिलकुमार अनभुले, कवी फुलचंद नागटिळक, गोरक्षनाथ भांगे, मुख्याध्यापक अनिलकुमार बरकडे, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, डॉ. तानाजी जाधव, विशाल अनभुले, ओमराज सावंत यांच्यासह शेतकरी, लेखक, कवी, साहित्यिक उपस्थित होते.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button