बार्शी तालुका पोलिस ठाण्याची मोठी कारवाई; पत्नीचा खून करून फरार झालेल्या आरोपीस अटक, हत्यार जप्त

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. २५ मे २०२६ : बार्शी तालुका पोलिसांनी पत्नीचा खून करून फरार झालेल्या आरोपीस तात्काळ अटक करत गुन्ह्यात वापरलेले धारदार हत्यार जप्त केले आहे. २५ मे रोजी सकाळी सुमारे १०:१५ वाजण्याच्या सुमारास धनश्री ऋषिकेश पाटील या बचत गटाचे काम करून लक्षाचीवाडी गावाकडून बार्शीकडे येत होत्या. त्यावेळी बार्शी-परांडा रोडवरील प्रविण हॉटेलजवळ आरोपी ऋषिकेश संभाजी पाटील (रा. नागणे प्लॉट, परांडा रोड, बार्शी) याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत धारदार हत्याराने तिच्या गळ्यावर, मानेला व पोटावर वार केले.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने व पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी जितेंद्र विश्वनाथ गायकवाड (वय ५६, रा. कासारवाडी, ता. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गु.र. नं. 151/2026 अन्वये बीएनएस कलम 103(1) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीस तात्काळ ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले असून फिंगरप्रिंट, डॉग स्कॉड व फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कवाडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने व त्यांच्या पथकाने केली.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कवाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा, पो.नि. संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण, पो.नि. बालाजी कुकडे बार्शी शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहा. पो.नि. महेश माने, पो.उपनिरीक्षक बालाजी वळसने, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव, पोहई चंद्रकांत घोडके, एमएसआय सदाशिव गवळी, पोहेकॉ/373 राजेंद्र मंगळवे, पोहेकॉ/1747 धनराज केकाण, पोहेकॉ/1632 अभय उंदरे, पोहेकॉ/750 सुभाष सुरवसे, महिला पोहेकॉ/432 स्वाती काटे, पोकॉ/358 बालाजी हांगे, पोकॉ/1130 लोढे, पोकॉ/175 खांडेकर, पोहेकॉ/1575 दशरथ बोबडे, पोहेकॉ/1646 अमित घाडगे, पोकॉ/747 राहुल बांदर, पोकॉ/1219 नागनाथ आंधळे, पोकॉ/1027 सुरेश बिरकले, पोकॉ/1997 ओमप्रकाश दासरे, पोकॉ/1099 गोविंद बचुटे, पोकॉ/24 शिवशंकर खराडे यांनी केली आहे.




