क्राईमबार्शीमहाराष्ट्र

बार्शीत ‘निर्भया पथका’ची धडक कारवाई!मानेगाव येथे छापा; १५ हजारांहून अधिक रुपयांचा मद्यसाठा जप्त!

B1न्यूज मराठी नेटवर्क5009

​बार्शी : तालुक्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, बार्शी उपविभागात विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा आणि बार्शीचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत असलेल्या अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाने बार्शी-वैराग रोडवरील मानेगाव येथे गुरुवारी दुपारी धाडसी छापा टाकला. या कारवाईत १५ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.590मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, गुरुवार दिनांक २१ मे २०२६ रोजी दुपारी २:२० वाजण्याच्या सुमारास निर्भया पथकाने बार्शी ते वैराग रोडवरील मौजे मानेगाव येथील ‘हॉटेल शिवार’च्या पाठीमागील बाजूस अचानक छापा टाकला. यावेळी रोहित दादासाहेब ताटे (वय २६, रा. मानेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) हा तरुण कोणत्याही परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे विविध कंपन्यांच्या देशी-विदेशी दारूची विक्री करत असताना रंगेहात आढळून आला.

​पोलिसांनी केलेल्या या कारवाईत नामांकित कंपन्यांच्या दारू आणि बिअरचा मोठा साठा जप्त केला आहे. यामध्ये खालील ब्रँड्सचा समावेश आहे:
​विदेशी दारू: ओल्ड मंक, ग्रॅण्ड मास्टर, रॉयल स्टॅग, मास्टर डिलाईट, रॉयल चॅलेंज, मॅकडॉवेल नंबर वन, मुंबई माल्ट, इम्पिरियल ब्ल्यू. ​देशी दारू: टॅंगो पंच. ​बिअर: टुबर्ग, कार्ल्सबर्ग आणि किंगफिशर असा पोलिसांनी कारवाई दरम्यान एकूण १५,१४५ रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे.
5000
​या प्रकरणी निर्भया पथकाचे पोलीस हवालदार हनुमंत लिंबाजी पाडुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रोहित ताटे याच्याविरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​
​सदरची धडक कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या आदेशानुसार ​पोहेकॉ बाबासाहेब घाडगे, ​पोकॉ हनुमंत पाडुळे, ​मपोकॉ नम्रता गटकूळ, ​चालक पोकॉ भाऊसाहेब महानोर यांच्या पथकाने चोखपणे पार पाडली. ​या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास पोलीस कर्मचारी मुंडे करत आहेत. पोलीस प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे बार्शी तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button