निवडबार्शीमहाराष्ट्र

भाजप युवा मोर्चा बार्शी शहराध्यक्षपदी अमोल डिसले यांची नियुक्ती

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या बार्शी शहराध्यक्षपदी युवा, अभ्यासू आणि सामाजिक भान जपणारे कार्यकर्ते अमोल डिसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते तसेच जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य युवा मेळाव्यात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी भाजप शहराध्यक्ष महावीर कदम, तालुकाध्यक्ष गडदे यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.5000अमोल डिसले हे प्रतिष्ठित शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित आणि सामाजिक जाण असलेले तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जातात. मागील पंधरा ते वीस वर्षांपासून ते माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे विश्वासू व एकनिष्ठ सहकारी म्हणून कार्यरत आहेत. डिसले कुटुंबाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचा समृद्ध वारसा लाभला असून त्यांचे वडील सुधाकर डिसले हे सेवानिवृत्त एक्साईज इन्स्पेक्टर म्हणून कार्यक्षम अधिकारी राहिले आहेत.

शैक्षणिक पदवी पूर्ण केल्यानंतर अमोल डिसले यांनी बार्शीत डिजिटल व्यवसाय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर रिअल इस्टेट आणि डेव्हलपर्स क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. व्यवसायासोबतच समाजकार्यात सातत्याने सक्रिय राहून त्यांनी युवकांमध्ये विशेष लोकप्रियता मिळवली आहे.500त्यांच्या सुस्वभाव, मित्रपरिवारातील मजबूत संपर्क आणि समाजकारण-राजकारणातील आवडीमुळे भाजप युवा मोर्चाला त्यांच्या नियुक्तीचा निश्चितच मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या नियुक्तीनंतर माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी नगराध्यक्ष रमेशआण्णा पाटील, विजयनाना राऊत, हळदुगेचे सरपंच मेजर जगताप, धामणगावचे सरपंच एस. के. पाटील, उपसरपंच महेश बोधले यांच्यासह विविध मान्यवरांनी अमोल डिसले यांचे अभिनंदन केले आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button