बार्शीमहाराष्ट्रसत्कार

पर्यावरणपूरक उपक्रमातून बार्शी तालुका पोलीस पाटील संघटनेकडून माने साहेबांचे स्वागत

बार्शी तालुका पोलीस ठाण्यात नूतन प्रभारी अधिकारी महेश माने यांचे स्वागत

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे नूतन प्रभारी अधिकारी म्हणून महेश माने साहेब यांची नुकतीच नियुक्ती झाली असून, त्यांच्या स्वागतासाठी बार्शी तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या स्वागत समारंभात तालुकाध्यक्ष शंकर गायकवाड, उपाध्यक्ष महेश शिंदे, सचिव बाळकृष्ण पिसे, तसेच रोंगे पाटील, महेंद्र पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व पोलीस पाटील व महिला पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.500यावेळी माने साहेबांनी उपस्थित पोलीस पाटलांना मार्गदर्शन करत सामाजिक बांधिलकी व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व व कायदे विषयी अधोरेखित केले. तसेच त्यांनी सर्व पोलीस पाटील यांना आंबा, जांभूळ, चिकू व पेरू या फळझाडांची रोपे भेट देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत केले.5000पर्यावरणपूरक उपक्रम राबवत समाजात सकारात्मक संदेश देणाऱ्या या अभिनव संकल्पनेचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, बार्शी तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने माने साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button