बार्शीमहाराष्ट्रशैक्षणिक

तांदुळवाडीच्या’ सुयश विद्यालय’ची दहावी बोर्ड परीक्षेत बाजी, प्रशाळेचा 100% निकाल नेत्रदीपक निकाल

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : तांदूळवाडीतील सुयश विद्यालय तांदुळवाडीने माध्यमिक शालांत परीक्षेत यावर्षीही 100% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत शैक्षणिक क्षेत्रात आपले अग्रस्थान पुन्हा सिद्ध केले आहे.

यंदा शाळेची विद्यार्थिनी समृद्धी शरद कदम हिने 99% गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला असून, द्वितीय क्रमांक पूनम अभिजित पाटील 98% व हर्षदा संतोष शिंदे 98% गुण मिळवून पटकावला तर तृतीय क्रमांक हर्षल हेमंत गुळवे याने 97.40% गुण मिळवून पटकावला. शाळेच्या स्थापनेपासूनच सुयश विद्यालयाने 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे.500शाळेचे विद्यार्थी केवळ शैक्षणिक गुणवत्तेतच नव्हे, तर कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि मूल्य शिक्षणातही आघाडीवर आहेत. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी हॉलीबॉल, स्केटिंग, तिरंदाजी, धावणे, जलतरण, बुद्धिबळ, टेबल टेनिस, क्रिकेट आणि खो-खो या क्रीडा प्रकारांत तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे.

पूर्व-प्राथमिक विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या शाळेत डिजिटल क्लासरूम, मेडिटेशन, योगा, कवायत तसेच विविध सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवला जातो. दैनंदिन परिपाठातून मूल्य शिक्षणावर विशेष भर दिला जातो.5009शाळेच्या मार्गदर्शक सौ. प्रतिभा नलवडे, संस्थेचे संस्थापक शिवदास नलवडे साहेब,आणि मुख्याध्यापक प्रदीप शिर्के यांनी यशस्वी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आधुनिक शैक्षणिक पद्धतींचा अवलंब करत सुयश विद्यालय तांदुळवाडी बार्शी तालुक्याच्या शैक्षणिक विश्वात गगनभरारी घेत असल्याचे दिसून येत आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button