ना. भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत खरवली ग्रामपंचायतीतील सदस्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

0

माणगाव तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाला मोठ खिंडार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला कायमचा रामराम ठोकत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) माणगाव तालुक्यातील खरवली ग्रामपंचायतीमध्ये महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली असून, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय नेते ना. भरतशेठ गोगावले यांच्या कार्यपद्धतीवर व विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विनया पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) ,नम्रता जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस),भारती सत्वे (राष्ट्रवादी काँग्रेस),प्रशांत मोरे (राष्ट्रवादी काँग्रेस),कल्पेश मोरे (शेतकरी कामगार पक्ष) या सदस्यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.5000भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव तालुक्यात वेगाने होत असलेला सर्वांगीण विकास, जनतेशी असलेला थेट संवाद आणि प्रश्न सोडवण्याची तत्परता यामुळे प्रभावित होऊन या सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रवेशामुळे माणगाव तालुक्यात शिवसेनेची ताकद आणखी बळकट झाली असून, आगामी काळात विकासकामांना अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.50090यावेळी बोलताना ना. भरतशेठ गोगावले यांनी सर्व नव्याने प्रवेश केलेल्या सदस्यांचे स्वागत करत जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध राहून एकत्रितपणे काम करू असा विश्वास व्यक्त केला. या पक्ष प्रवेश समारंभा प्रसंगी प्रमोद घोसाळकर (जिल्हाप्रमुख), महेंद्र मानकर ( तालुकाप्रमुख) डॅा अमेय प्रभाकर उभारे, सुशिल शिंदे (साई गण संपर्क प्रमुख) , विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी , सदस्य, युवा सेना, व महिला आघाडी उपस्थित होते.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या