तरुणांसाठी पंंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

सोलापूर, दि. ५ : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांच्या वतीने पंंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी आयोजित करण्यात येणार आहे.

या मेळाव्यात विविध खासगी कंपन्या, कारखाने व उद्योगसमूहांमार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. पात्र उमेदवारांना तत्काळ रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.5000नोकरी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोर्ट, पार्क चौक, सोलापूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील आस्थापनांनी त्यांच्या रिक्त पदांची माहिती या कार्यालयास कळवावी, असेही सांगण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक ०२१७-२९९२९५६ वर संपर्क साधावा किंवा https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ही माहिती सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता श्रीमती संगीता खंदारे यांनी दिली आहे.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या