पुणेमहाराष्ट्रशिबीर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

शिबारात ३२१ रक्तपिशव्यांचे संकलन

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बारामती, दि. ३० : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे २८ व २९ मे २०२६ या कालावधीत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबारात एकूण ३२१ रक्तपिशव्यांचे संकलन झाले असून ते विविध गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहे तसेच रक्तदानाचा सामाजिक संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात हा उपक्रम उपयुक्त ठरणारा आहे.5000रक्तदान हे श्रेष्ठ समाजसेवेचे कार्य असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे तसेच समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. विशेषतः या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करून या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदविला.5000शिबिराच्या आयोजनासाठी उपअधिष्ठाता डॉ. प्रज्ञा भालेराव, शरीरविकृती शास्र विभागप्रमुख डॉ. नकाते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश उमप, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे यांच्यासह कर्मचारी वर्गाने योगदान दिले.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button