दिनबार्शीमहाराष्ट्र

“सुयश विद्यालय, बार्शी येथे महाराष्ट्र दिन उत्साहात; संस्थापकांचे प्रेरणादायी मार्गदर्शन”

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : सुयश विद्यालय, बार्शी येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.5000या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक शिवदास नलवडे साहेब, संस्थेच्या मार्गदर्शिका सौ प्रतिभा नलवडे मॅडम, मुख्याध्यापिका अलका जगताप तसेच उपमुख्याध्यापक श्री येवले सर उपस्थित होते.5000मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यानंतर संस्थापक श्री शिवदास नलवडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना महाराष्ट्र दिनाचे महत्त्व समजावून सांगत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी एकजूट, परिश्रम आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले.5000कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांनी देशप्रेम आणि एकात्मतेचा संदेश दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button