संघर्षातून शिखर गाठलं! सोलापूरच्या प्रथमेश शिंदेंची राज्यात दुसरी रँक

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्यायदानाधिकारी 2023 च्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोलापूरचे सुपुत्र प्रथमेश रमेश शिंदे यांनी या परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे.5000सन 2017 मध्ये प्रमेश यांनी कायद्याची पदवी संपादन केली. त्यावेळी त्यांनी सोलापूर विद्यापीठातून सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर एल.एल.एम. पदवीही त्यांनी प्रथम प्रयत्नात पूर्ण केली. समाजकार्य विषयातही त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सध्या ते वकिली व्यवसायासोबत दयानंद विधी महाविद्यालय, सोलापूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून कायद्याचे ज्ञानदान करत आहेत.50000“वकिली करताना सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यातूनच न्यायाधीश होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास केला. तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. यापूर्वी एकदा वेटिंग लिस्टमध्ये होतो. निकालात स्वतःचे नाव पाहणे हा आनंदाचा क्षण आहे, पण राज्यात दुसरा येणे हा खूप मोठा अनुभव आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, बहीण-भाऊ, पत्नी सौ. मोनाली तसेच मार्गदर्शक प्रा. गणेश पवार आणि adv. गणेश शिरसाठ यांना दिले.50009

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या