प्रत्येक व्यावसायिक वाहन चालकाला ‘व्यावहारिक मराठी’ अवगत असणे आवश्यक – परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवण्याचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक चालकाला ‘व्यावहारिक मराठी’ अवगत असणे आवश्यक आहे, यावर राज्य शासन ठाम आहे. ज्यांना मराठी येत नाही अशा अमराठी चालकांना ती शिकवण्यासाठी रिक्षा संघटनांनी सकारात्मक सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.50000मंत्रालयातील आयोजित बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, कामगार नेते शशांक राव, संजय निरुपम, हजी अराफत शेख तसेच विविध रिक्षा व टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून रोजगारनिर्मिती हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे. मात्र राज्यात व्यवसाय करताना आणि सर्वसामान्य प्रवाशांशी संवाद साधताना संबंधित चालकाला व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे ही किमान अपेक्षा आहे. राज्यभाषा म्हणून मराठीला सन्मान मिळावा, यासाठी अमराठी चालकांनी ती शिकणे आवश्यक आहे.5000प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक मराठी चालकांना शिकवण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहे. या उपक्रमात मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांसारख्या संस्थांचे तसेच साहित्यिकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. याशिवाय रिक्षा व टॅक्सी संघटनांनीही मराठी शिकवण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी ठराविक मुदत द्यावी, ही संघटनांची मागणी योग्य असून त्यावर सकारात्मक विचार सुरू आहे. तथापि, मराठी भाषा शिकणारच नाही अशी मुजोरी दाखवणाऱ्यांच्या बाबतीत मात्र कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्री सरनाईक यांनी दिला. तसेच मंगळवारी परिवहन आयुक्तालयात राज्यातील ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.5000रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेच्या व्यवहारिक ज्ञानासंदर्भात लघु अभ्यासक्रम तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यानुसार जनजागृती उपक्रम राबवून चालकांना मराठी शिकण्यासाठी आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांना ‘व्यावहारिक मराठी’ भाषा अवगत असणे अनिवार्य करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून या उपक्रमाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या