बार्शीमहाराष्ट्र

सांगोल्यात सर्वपक्षीयांचा भाजप महायुतीचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांना जाहीर पाठींबा

सांगोला येथील अयोध्यानगरी येथे आयोजित कार्यक्रमात भाजप महायुतीचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांना सर्वपक्षीय नेते व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी जाहीर पाठिंबा दिला.

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला येथे भाजप महायुतीचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले आहे. सांगोला येथील अयोध्यानगरी येथे आयोजित कार्यक्रमात विविध पक्षांच्या नेत्यांनी, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी राजाभाऊ राऊत यांना जाहीर पाठींबा दर्शविला.

या कार्यक्रमात 25 नगरसेवक, 7 जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती अशा एकूण 34 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी महायुतीचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांच्या उमेदवारीस पाठिंबा जाहीर केला. या पाठिंब्यामुळे त्यांच्या प्रचार मोहिमेला आणखी बळ मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.500यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार शहाजी बापू साळुंखे, नगराध्यक्ष आनंदा माने, जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सभापती चेतनसिंह केदार सावंत यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात राजाभाऊ राऊत यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात महायुतीच्या उमेदवारीला सर्वपक्षीय स्तरावर मिळालेला पाठिंबा हा आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button