आरोग्यपत्रकार विषयकमहाराष्ट्रशिबीरसोलापूर

लेखणीच्या आरोग्याची काळजी! पत्रकारांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

‘आयुष्यमान भारत’ ची जागीच नोंदणी

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

पंढरपूर : पंढरपूरमधील पत्रकार बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. पत्रकारिता क्षेत्रातील धावपळ आणि कामाचा ताण लक्षात घेता, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक विशेष पाऊल उचलण्यात आले आहे. अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ सोलापूर जिल्हा आणि ट्युलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूरमध्ये ‘महा आरोग्य तपासणी शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.50000
हे शिबिर रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पार पडणार आहे. पंढरपूर शहर, तालुका आणि परिसरातील सर्व पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हे शिबिर पूर्णपणे मोफत असणार आहे. प्रसिद्ध डॉक्टर प्रशांत निकम आणि त्यांची सात तज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांची प्रत्यक्ष तपासणी करणार आहे.
50000
प्राथमिक तपासणीनंतर जर पुढील काही चाचण्यांची आवश्यकता भासली, तर त्यावर ५० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. शिबिरादरम्यान एखाद्या रुग्णाला ऑपरेशनची गरज असल्याचे आढळल्यास, ऑपरेशनच्या खर्चातही विशेष सवलत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, पात्र रुग्णांना शासनाच्या सर्व आरोग्य योजनांचा लाभ येथे मिळणार आहे. ज्या पत्रकार बांधवांकडे अद्याप ‘आयुष्यमान भारत कार्ड’ नाही, त्यांच्यासाठी या शिबिरात नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्रे सोबत आणून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
50000
​ट्युलिप हॉस्पिटलचे डॉक्टर प्रशांत निकम आणि डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी पंढरपूर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना या शिबिरात सहभागी होऊन आपली आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
​पत्रकारितेच्या धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे, आणि याच उद्देशाने या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सात तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन पुढील तपासणीवर मोठी सवलत शस्त्रक्रियेतही भरघोस सवलत
आहे.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button