प्रवीण काकडे यांची शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुखपदी निवड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सोलापूर जिल्हा प्रमुखपदी प्रवीण काकडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवीण काकडे हे गेल्या दहा वर्षांपासून शिवसेना बार्शी तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत असून त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात लोकसभा व विधानसभा निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या असून पक्ष वाढीसाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.50000नवीन जबाबदारीनुसार प्रविण काकडे यांच्यावर मोहोळ, बार्शी व माळशिरस या तालुक्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्ष संघटन वाढीसाठी होईल, असा विश्वास पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, त्यांच्या निवडीचे सर्वसामान्य शिवसैनिकांतून स्वागत करण्यात येत असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या