गुळपोळीत श्री काळभैरवनाथ यात्रेत पारंपरिक सोंगांच्या गाड्यांनी वेधले नागरिकांचे लक्ष

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी, ता. ७ : गुळपोळी (ता. बार्शी) येथील गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रोत्सवानिमित विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान जयंती निमित्त सुरू झालेल्या यात्रेसाठी तालुक्यासह परिसरातील नागरिकांसह भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. आकर्षक विद्युत रोषणाई… सोबतीला मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल अशा उत्साही व भक्तीमय वातावरणात यात्रा संपन्न झाली. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या पारंपरिक सोंगाच्या गाड्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.5000बार्शी तालुक्यासह आसपासच्या ग्रामीण भागात जत्रेच्या निमित्ताने ‘पारंपारिक सोंगे’ काढण्याची परंपरा आजही तितकीच जिवंत आहे. अंगाला रंग लावून, देवांची किंवा पौराणिक पात्रांची रूपे धारण करून ही पात्रे जेव्हा गावातून फिरतात, तेव्हा ती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळते. यावेळी या पात्रांना पाहण्यासाठी नातेवाईक, ग्रामस्थ व आसपासच्या गावातील नागरिक, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. विनोदी वृध्द दाम्पत्यांच्या पात्रांनी भाविकांना खळखळून हसविले. नेत्रदीपक शोभेच्या दारूकामाने डोळ्यांचे पारणे फेडले.5000गावातील तरुण मुले, आबाल वृद्ध, व गावातील काही कलाकार राम-लक्ष्मण, हनुमान, गणपती, अस्वल, रावण, लव-कुश, भीम-अर्जुनाचे पात्र घेतात. ही पात्रे जेव्हा एकमेकांना धारेवर धरतात, तेव्हा जुन्या पिढीतील आठवणी ताज्या होतात. प्रामुख्याने हनुमान, रावण व सीताचे सोंग विशेष आकर्षणाचे केंद्र ठरते. आजच्या डिजिटल युगात जिथे मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध आहेत, तिथे या पारंपारिक सोंगे आपली वेगळी ओळख टिकवून ठेवली आहे. ही केवळ करमणूक नसून, स्थानिक संस्कृती आणि लोककलेचा एक अविभाज्य भाग आहे.5000पावसामुळे सर्वांची धावपळ कार्यक्रम सर्व जोमात सुरु असतानाच मध्यरात्री दीड ते पाऊणे दोन वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस सुरु झाला. यामुळे रंगात आलेला सोंगाचा कार्यक्रम ऐनवेळी बंद पडला. यामुळे सोंगे पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला. या पावसामुळे सर्वांचीच त्रेधातिरपिट उडाली. यात्रेच्या यशस्वीतेसाठी यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व विविध संघटनांनी मोठे परिश्रम घेतले.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या