जिल्हा रस्ता सुरक्षा उपक्रमात हेल्मेट वापराविषयी जनजागृती

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

अकोला दि ६ : जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ “हेल्मेट असेल तरच प्रवेश” असा संदेश देणारे जनजागृती फलक लावण्याचा अभिनव निर्णय घेण्यात आला आहे.5000हा उपक्रम प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला असून, नागरिकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा प्रभावी प्रयत्न ठरणार आहे.
सदर जनजागृती फलकाचे अनावरण जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या जीविताच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक बाब आहे. अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक बदल घडेल.” तसेच दुचाकी अपघातात मृतांच्या संख्येत घट होण्यास निश्चितच मदत होईल.
5000
बैठकीस विविध शासकीय विभागांचे अधिकारी, पोलीस विभागाचे प्रतिनिधी तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाचे स्वागत करून याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प व्यक्त केला. या उपक्रमामुळे जिल्ह्यात रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती वाढून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या