महाराष्ट्रसोलापूर

जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

पंढरपूर, दि०४ : सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे व नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांचा उपरणे व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार केला. 5000
यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले उपस्थित होते.
5000
कार्तिकेयन एस. हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २०२० बॅच चे (आय. ए. एस.) महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. ते यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी पंढरपूर येथे भेट देऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सदर कामाची माहिती कार्तिकेयन एस. यांनी घेतली. यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या व करण्यात आलेल्या कामांची माहिती यावेळी दिली. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button