बार्शी बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. रणजित गुंड उपाध्यक्षपदी ॲड. अक्षय पाटील, सचिवपदी ॲड. प्रकाश साखरे तर बार लायब्ररी चेअरमनपदी ॲड. अमोल आलाट यांची निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार असोसिएशनच्या सन २०२६–२७ या वर्षासाठी झालेल्या निवडणुकीत ॲड. रणजित गुंड यांची अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या निवडणुकीतही त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. यंदाही मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत स्पष्ट बहुमताने विजय मिळवून दिला. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲड. रणजित गुंड आणि ॲड. शितल गुंड यांच्यात थेट लढत झाली. त्यात ॲड. रणजित गुंड यांना २८० तर ॲड. शितल गुंड यांना ७० मते मिळाली. त्यामुळे ॲड. गुंड यांनी तब्बल २१० मतांनी दणदणीत विजय मिळवला. सचिवपदी प्रकाश साखरे यांची निवड झाली. त्यामध्ये, केदार पाटील आणि प्रकाश साखरे यांच्यात चूरशीची लढत झाली.
उपाध्यक्षपदी ॲड. अक्षय पाटील, सचिवपदी ॲड. प्रकाश साखरे तर बार लायब्ररी चेअरमनपदी ॲड. अमोल आलाट यांची निवड झाली. खजिनदारपदी ॲड. सूरज राऊत यांची निवड झाली असून व्यवस्थापन समितीच्या पाच सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
ही निवडणूक सोमवारी (दि. ३० मार्च) बार्शी दिवाणी न्यायालयातील बार रूममध्ये पार पडली. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान झाले. एकूण ४५२ मतदारांपैकी ३५२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत निकाल जाहीर करण्यात आला.
दरम्यान, पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ॲड. रणजित गुंड यांनी वकिलांच्या प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देऊन न्यायालयीन कामकाज अधिक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.





