बार्शीसामाजिक

अशी ही सामाजिक बांधिलकी : महामानव संस्थेच्यावतीने अशोक नागटिळक यांचे वाढदिनी स्नेहग्रामला किराणा- धान्याची मदत

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : रातंजन येथील मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नागटिळक महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहग्राम कोरफळे येथील मुलांना किराणा, धान्य व फळे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमांतून संस्थेने सामाजिक दातृत्व जपले.अशोक नागटिळक महाराज यांनी समाजातील वंचित मुलांना मायेला ओलावा मिळावा, भूकेचा प्रश्न लक्षात घेऊन स्नेहग्रामला ही मदत दिल्याचे यावेळी सांगितले.यावेळी स्नेहग्रामच्या मुलांना अशोक नागटिळक यांचे अभिष्टचिंतन केले. तर महेश निंबाळकर यांनी अशोक नागटिळक यांचा सन्मान केला. याप्रसंगी मानवता बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव बापू नागटिळक, उपाध्यक्ष गौतम नागटिळक, महामानव बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, किरण खुरंगळे , परमेश्वर बिले, आकाश बनसोडे , रमेश नागटिळक , निलेश गिराम , आप्पा स्वामी , आप्पा हिवरे , सूरज मिसाळ , विष्णू शिंदे , बाळू नागटिळक, श्रीराज हजारे, विनया निंबाळकर, वर्षा चाबुक, शंतनु घळके, तुषार तिकटे आदि मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे कार्यक्रम आयोजन महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना भैरवनाथ चौधरी, सूत्रसंचालन गौतम नागटिळक तर आभार प्रदर्शन किरण खुरंगळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button