विजयी मेळावा : पूर्णवेळ कर्मचारी मान्यतेसाठी संघटना तुमच्या पाठीशी ; अर्धवेळ स्त्री परिचर सावित्रींच्या कृतिशील वारसदार – कॉ. तानाजी ठोंबरे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : समाजातील काही लबाड प्रवृत्तीच्या फसवणुकीमुळे पुण्यात महिलांवर आत्महत्येची वेळ आलेली होती. आत्महत्या रोखण्यासाठी घरात बालकाश्रम काढून गर्भवतींचे बाळंतपण आणि बालकांचा सांभाळ करून आरोग्य सेवेचा नवा आदर्श निर्माण केलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या खऱ्या वारसदार गाव खेड्यात काम करणाऱ्या अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचार आहेत. तीन हजारावरून सहा हजारांचे मानधन झाले याचा आनंद आहे. 5000भविष्यात पूर्ण वेळ कर्मचारी मान्यतेसाठी लालबावटा युनियन कायम लढत राहील असा आशावाद कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांनी व्यक्त केला. ठोंबरे पुढे म्हणाले; शासनाने तीन हजार रुपयांचे मानधन सहा हजार रुपये केले याचा आनंद आहे; हा आनंद साजरा करत आहोत परंतु एकीकडे समाजात मिधेपणा निर्माण करून मतपेटी शाबूत करण्यावर भर दिला जात आहे. तुम्ही खेड्यापाड्यात महिलां-मुलांच्या आरोग्यासाठी अल्प मानधनावर काम करत आहात. गावात दवाखाना आहे पण डॉक्टर नाहीत. तुम्हीच त्यांचे काम करत आहात परंतु शासन तुम्हाला पूर्ण कर्मचारी मानत नाही; संघटन शक्तीच्या जोरावर आपण हक्क मिळवून घेऊ; असे प्रा. तानाजी ठोंबरे म्हणाले.5000गेल्या 30 वर्षापासून लढ्याचा मागवा घेताना काही संघटना श्रेय लाटण्यासाठी पुढे येत आहेत परंतु लालबावडा व इतरांच्या कृती समितीच्या लढ्यामुळे संघटनेच्या पदरात सहा हजार रुपयाची मानधन मिळाले आहे शासनाचे हे परिपत्रक काढण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर , तसेच राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सचिव मंगेश शिंदे व महाराष्ट्र राज्य आरोग्य संचालिका हजारे ताई यांनी प्रयत्न केले आहेत, पुढील काळात पूर्णवेळ कर्मचारी म्हणून मान्यता, पेन्शन, ग्रॅज्युएटी , 21 हजार रुपये किमान वेतन , शासकीय सुट्ट्या, रजा, जिल्हा परिषदेच्या सेवेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून मान्यता, वाढीव बोनस हे सर्व संघटना मिळवून देईल असे राज्य संघटना कृती समितीचे संघटक कॉम्रेड निलेश दातखीळे ( पुणे ) यांनी सांगितले.5000आयटक संलग्न अंशकालीन आरोग्य स्त्री परिचय संघटनेच्या जिल्हास्तरीय विजयी मेळाव्याच्या निमित्ताने ते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड निलेश दातखीळे ( पुणे ), कॉम्रेड ए.बी. कुलकर्णी, लहू आगलावे, श्रीकांत कांबळे, अनिरुद्ध नखाते, लहू आगलावे, राजेंद्र करली, विक्रम तडकापल्ली, यशवंत फडतरे ,शकुंतला गोली आदी उपस्थित होते. यावेळी प्रतिनिधिक महिलांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तुद यांनी केले.5000स्त्री परिचय संघटनेच्या लढ्यात आम्ही सर्व कार्यकर्त्यांसह आयटक सोबत राहील; गेल्या 30 वर्षापासून आयटक समाजातील विविध कामगारांच्या हक्कासाठी लढत आहे; त्याचप्रमाणे स्त्री परिचय संघटनेच्या पाठीशी जिल्ह्यातील कार्यकर्ते उभे राहतील; असे आयटक चे जिल्हा सचिव कॉम्रेड एबी कुलकर्णी यांनी सांगितले5000कॉम्रेड प्रमिला शिंदे, कॉम्रेड शितल करडे, कॉम्रेड सुवर्णा नेंदाने, कॉम्रेड उषा कांबळे, कॉम्रेड विद्या झेंडे , कॉम्रेड सुलोचना गुरव, कॉम्रेड पिंकीताई चेंडगे, कॉम्रेड अनुराधा बोडरे, कॉम्रेड मनीषा रणसिंग ,कॉम्रेड पूजा पारसे, मीनाक्षी मोलाणे, जोप्ना दावने , शबीरा तांबोळी, माधुरी साठे , महानंदा मोटे, मैना तोरणे, तोळाबाई ओव्हाळ, जयश्री नगरे, सुरेखा झोंबाडे , अंबाबाई गायकवाड आदी महिलांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या