बार्शी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता कमिटी बैठक आयोजित
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बार्शी शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही बैठक शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता आयोजित करण्यात आली असून, बैठकीचे ठिकाण यशवंतराव चव्हाण सभागृह, पांडे चौक, बार्शी असे निश्चित करण्यात आले आहे. या बैठकीस शहरातील सर्व मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शांतता कमिटीचे सदस्य, तसेच पत्रकार बंधू व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. ही बैठक आगामी जयंती उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.






