धाराशिवमहाराष्ट्रयोजना

बौद्ध संस्थांसाठी पायाभूत सुविधांकरिता १० लाखांपर्यंत अनुदान : २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

धाराशिव : धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या तसेच संस्थेमध्ये ५१ टक्केपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी सन २०२५-२६ या वर्षाकरिता अनुदान योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील इच्छुक बौद्ध संस्थांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत,असे आवाहन करण्यात आले आहे.

अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन परिपत्रक दिनांक २७/०१/२०२६ मधील तरतुदीनुसार अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत,याची संबंधित संस्थांनी नोंद घ्यावी.

तसेच अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन शासन निर्णय ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी अन्वये या योजनेअंतर्गत पायाभूत सोयी-सुविधांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाची मर्यादा रु.२.०० लाखांवरून वाढवून रु.१०.०० लाख करण्यात आली आहे.

सदर शासन निर्णय,अर्जाचा नमुना तसेच आवश्यक कागदपत्रांची यादी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक व पात्र संस्थांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी पुंडलिक गोडसे यांनी केले आहे.500000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button