हॉटेल व्यवसायिक अडचणीत ; गॅस पुरवठा सुरळीत करा संघटनेची मागणी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : सध्या सुरू असलेल्या गॅस टंचाईमुळे बार्शीतील हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा मागील काही दिवसांपासून पूर्णतः बंद असल्याने अनेक हॉटेल व्यवसाय १०० टक्के बंद पडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.
गॅस अभावी हॉटेल चालवणे अशक्य झाल्याने व्यावसायिकांचे कर्जाचे हफ्ते थकले असून, कर्मचाऱ्यांना पगार देणेही कठीण झाले आहे. तसेच परमिट रूम धारकांसाठी परवाना शुल्क भरणेही अवघड बनले आहे. या परिस्थितीमुळे संपूर्ण हॉटेल उद्योग अडचणीत सापडला आहे.
50000या पार्श्वभूमीवर बार्शी हॉटेल असोसिएशन अध्यक्ष इम्तियाज तांबोळी यांनी असोसिएशनच्या वतीने प्रशासनाकडे तातडीने व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली यावेळी सेक्रेटरी अमर शेट्टी, विजय लढ्ढा,योगेश आग्रवाल , माने उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या