उद्घाटनमहाराष्ट्रसातारा

विकसित भारतच्या उभारणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे; शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

​सातारा : विकसित भारताचे स्वप्न साकारण्यामध्ये अंगणवाडी सेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सुसंस्कृत पिढी घडवण्यासोबतच गरोदर मातांची काळजी घेण्याचे पवित्र कार्य त्या करत आहेत. त्यांच्या सर्व रास्त मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले.50000भारतीय मजदुर संघ संलग्न महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ यांचे तिसरे वार्षिक प्रदेश अधिवेशन महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय, मंगळवार पेठ सातारा येथे संपन्न झाले. या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, नगरसेविका सिद्धी पवार, भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमणे, महासंघाच्या सचिव संगीता श्रीवास्तव, सरचीटणीस किरण मिलगीर,श्रीपाद कुटासक, जिल्ह्यांतून आलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.5000अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत मंत्रालयात विशेष बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, सेविकांच्या हिताचे सकारात्मक बरेच निर्णय घेण्यात आले, असे सांगून राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या, अंगणवाडी सेविकांच्या कामाचा व्याप सुलभ करण्यासाठी शासनाकडून त्यांना नवीन मोबाईल संच देण्यात येत आहेत. यामुळे गरोदर मातांची नोंदणी, लसीकरण आणि इतर प्रशासकीय कामे ऑनलाइन पद्धतीने करणे सोपे होणार आहे.

आज होत असलेल्या अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या चर्चेतून निघणारे निष्कर्ष आणि मागण्यांवर शासन तातडीने आणि सकारात्मकतेने विचार करेल, असे आश्वासनही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यावेळी दिले.5000अंगणवाडी सेविका सुसंस्कृत व सुदृढ पिढी घडवण्याचे अमूल्य कार्य करीत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंगणवाडी सेविकांच्या प्रश्न सोडण्यावर विशेष लक्ष आहे. त्यांच्या अनेक मागण्या आतापर्यंत पूर्ण करण्यात आल्या असून, उर्वरित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे बोर्डीकर यांनी सांगितले.

​अंगणवाडी सेविका केवळ कर्मचारी नसून त्या सुदृढ समाजाचा पाया रचणाऱ्या समाजशिल्पी आहेत. त्यांच्या कष्टाची जाण ठेवून शासन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासनही महिला व बाल विकास राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी दिले.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button