जिल्हा परिषदमहाराष्ट्रसत्कारसोलापूर

पहिले कानमंत्र द्या नंतर कान धरा ; बुके हार ऐवजी शेतकऱ्यांचे साहित्य आणा ; नूतन अध्यक्ष उपाध्यक्षांचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदी बार्शी तालुक्यातील दीपक वैद्य यांची निवड झाली तर उपाध्यक्ष पदावर उत्तरचे इंद्रजीत पवार यांना संधी मिळाली. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष उपाध्यक्ष झाले आहेत. दरम्यान शुक्रवारी नूतन अध्यक्ष दीपक वैद्य आणि नूतन उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा सत्कार जिल्हा परिषद पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला.5000सत्काराला उत्तर देताना वैद्य आणि पवार यांनी त्यांच्याप्रती असलेली शेतकऱ्यांची तळमळ व्यक्त केली. आम्ही दोघेही नवीन आहोत, जिल्हा परिषदेचा अनुभव नाही त्यामुळे माध्यमाच्या प्रतिनिधींनी सुरुवातीला कानमंत्र द्यावा आणि जर सुधारणा नाही झाली तर निश्चित कान धरावे अशी भावना व्यक्त केली.50000सदस्य झाल्यापासून ते अध्यक्ष उपाध्यक्ष होईपर्यंत सत्कार सुरू आहेत त्यामुळे यापुढे सत्कार करताना हार बुके घेऊन येण्याऐवजी वही, पेन, शेतकऱ्यांना लागणारे साहित्य टिकाव,खोऱ्या, टोपली असे काहीही आणावे ते प्रेमाने स्वीकार केले जाईल असे वैद्य आणि पवार यांनी आवाहन केले आहे.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button