महाराष्ट्रसोलापूर

१० ॲाक्टोबर रोजी सोलापूर शहर व जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्याकडे सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर :महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची तयारी म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. हे नेते आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन मुलाखती घेणार आहेत.

लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्याकडे सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मुलाखतींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती १० ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता पासून घेणार आहेत त्यानंतर आपला गोपनीय अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला सादर करतील अशी माहिती सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे व जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button