निवडबार्शीमहाराष्ट्र

प्राणीमित्र सुमित अरुण नवले यांची मानद प्राणी कल्याण अधिकारी पदी निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : मा.उच्च न्यायालय, मुंबई व महाराष्ट्र शासनाद्वारे गठीत करण्यात आलेल्या महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा सनियंत्रण समितीच्या “मानद प्राणी कल्याण अधिकारी” (Honorary Animal Welfare Officer) पदी बार्शीचे सुपुत्र व प्राणीमित्र सुमित अरुण नवले यांची निवड करण्यात आली आहे.500सुमित नवले हे गेल्या दशकभरापासून सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये प्राणीसेवेचे कार्य निस्वार्थपणे करत आहेत. जखमी व बेवारस प्राण्यांवर उपचार, गोवंश संरक्षण, प्राण्यांवरील क्रूरता रोखणे व प्राणी कल्याण कायद्याबाबत जनजागृती या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शासन स्तरावरून ही निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे बार्शी तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली असून त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button