क्रीडा विषयकबार्शीमहाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजचा तृतीय क्रमांक

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने सांगोला येथे डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला दिनांक 10 ऑक्टॉबर रोजी आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामधील विविध संलग्नित महाविद्यालयामधील मुलींच्या एकूण १३ संघांनी सहभाग घेतला होता.

सदर स्पर्धेमध्ये झालेल्या चुरशीच्या बाद फेरी व साखळी फेरीमध्ये सामन्यात बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेजच्या संघाने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकविला.
या स्पर्धेमध्ये बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजच्या संघाला मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
500उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघाला बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. अशोक कदम, शारीरिक संचालक प्रा. रोहित डिसले, कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. किरण चपटे, आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. बाळासाहेब लांडे, व सर्व प्राध्यापक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले. संघ – ऋतुजा चव्हाण ,राजवी मंगरुळे, तनुजा कदम ,प्रतिक्षा कपिले, प्रसन्ना परब500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button