बार्शीसामाजिक

वैराग : रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नुतन IAS कलेक्टर शरण कांबळे यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : तडवळे ता.बार्शी येथे शरण कांबळे साहेब यांचा बहुजन समाजातुन IAS अधिकारी कलेक्टर झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देवुन सन्मान करण्यात आला. यावेळी कांबळे साहेबांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने केला व त्यासाठी केलेली तयारी अनुभव शेअर केला. तसेच महामानव डॉ.बाबासाहेब‌ आंबेडकर हेच माझ्यासाठी आदर्श आहेत. माझी प्रेरणा आहेत. ही भावना आपल्या मनोगतातुन व्यक्त केली.याप्रसंगी रिपाइं बार्शी तालुका अध्यक्ष दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब कांबळे, वैराग विभाग प्रमुख विकास बनसोडे, युवक तालुका अध्यक्ष अमोल कांबळे, तालुका सरचिटणीस श्रीशैल्य भालशंकर, वैराग शहर अध्यक्ष दिपक लोंढे,वैराग शहर युवक अध्यक्ष राहुल थोरात, डॉ. कांबळे सर बार्शी, राजाभाऊ गायकवाड, महेश जगझाप, प्रा.एकुरके ,ग्रामपंचायत सदस्य तडवळे संजय दावणे , मल्हारी दावणे तडवळे येथील सर्व कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button