प्रशासनबार्शीमहाराष्ट्र

नवरात्र उत्सव शांततेत शिस्तबद्धतेत आणि उत्साहात साजरा करा- पोलीस निरीक्षक गणेश कुंभार

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : रविवार, दि ११ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहर पोलीस ठाण्यात सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी शहरातील ३७सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. नवरात्रोत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे व महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी केले.500
नवरात्रोत्सवाच्या काळात अष्टमी, पौर्णिमा आदी दिवशी देवींच्या छबिना मिरवणुका काढण्यात येतात. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार या मिरवणुकांमध्ये ‘नो डीजे, नो डॉल्बी, नो लेझर’ या नियमाचे पालन करून पारंपरिक पद्धतीने आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने मिरवणुका काढाव्यात, अशा स्पष्ट सूचना पोलीस निरीक्षक कुंभार यांनी दिल्या.

सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी उत्सवासंदर्भातील आवश्यक सर्व परवानगी ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात. मंडप उभारताना रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच देवीच्या मूर्तीच्या ठिकाणी २४ तास स्वयंसेवकांचा पहारा ठेवावा आणि सुरक्षेच्या दृष्टीने मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असेही त्यांनी सांगितले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button