क्राईमनगरपरिषदबार्शीमहाराष्ट्र

मंजूर नकाशा पेक्षा अधिक बांधकाम केल्या प्रकरणी ; डॉ. रामचंद्र जगताप यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : बार्शी नगरपरिषदे कडून दिलेल्या बांधकाम परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून अतिरिक्त बांधकाम केल्याप्रकरणी बार्शीतील डॉ. रामचंद्र विनायक जगताप यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक नगररचनाकार वैभव विकास पायगुडे (वय २९, रा. साई पॅलासिओ, कासारवाडी रोड, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली.50000मिळालेल्या माहितीनुसार, सागर नागेश लंकेश्वर यांनी ९ मार्च २०२६ रोजी नगरपरिषदेकडे संबंधित बांधकामाबाबत तक्रार केली होती. त्यानंतर नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली असता मंजूर नकाशापेक्षा अधिक बांधकाम केल्याचे निदर्शनास आले.

तपासात तळमजला व पहिल्या मजल्यावर मंजूर आराखड्यापेक्षा अतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याचे आढळले. तसेच संबंधित इमारतीला निवासी वापराची मंजुरी असताना त्याचा वापर व्यावसायिक स्वरूपात करून तेथे लॅब सुरू करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले. याशिवाय दुसऱ्या मजल्यावर कोणतीही परवानगी न घेता सुमारे १४.६५ मीटर बाय ७.६० मीटर इतके अतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याचे आढळून आले.5000या संदर्भात नगरपालिकेकडून यापूर्वी १३ जून २०१९ रोजीही नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर ११ मार्च २०२६ रोजी पुन्हा नोटीस बजावून २४ तासांच्या आत अनाधिकृत बांधकाम हटविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र संबंधितांनी या नोटीसकडे दुर्लक्ष केल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३ (६-अ) अन्वये डॉ. रामचंद्र विनायक जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास बार्शी पोलीस करत आहेत.
50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button