बार्शी पंचायत समितीच्या सभापती पदी मीनाक्षी रोंगे तर उपसभापती पदी संतोष निंबाळकर यांची निवड

0

योगदान देणाऱ्यांचा सन्मान करून सर्वांना समान न्याय द्या – मा. आ. राजेंद्र राऊत

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू व निकटवर्तीय मानले जाणारे बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यात भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय संपादन करत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवले. जिल्हा परिषदेच्या 6 पैकी 6 जागा आणि पंचायत समितीच्या 12 पैकी 12 जागा तब्बल 57 हजार मतांच्या मताधिक्याने जिंकून बार्शीने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नवा विक्रम नोंदवला आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व दोन्ही शिवसेना एकत्रितपणे मैदानात उतरल्या असतानाही, संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बार्शी पंचायत समितीवर भाजपने एकहाती विजय मिळवत सर्व 12 जागांवर भगवा फडकवला. या विजयामुळे बार्शी तालुक्यात राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा प्रभावी छाप उमटली आहे.

पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात सभापती पदी मीनाक्षी रोंगे तर उपसभापती पदी संतोष निंबाळकर यांची निवड करण्यात आली. पिठासन अधिकारी अमोल सिंह भोसले यांच्या हस्ते नव्याने निवडून आलेल्या सभापती व उपसभापती यांना निवडीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते नव्याने निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना राजेंद्र राऊत म्हणाले की, “पार्टीसाठी ज्यांनी योगदान दिले आहे त्यांना विसरू नका, त्यांचा सन्मान करा. सर्व पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व जनतेला समान न्याय देऊन विकास कामांवर भर द्यावा. विकास कामांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही” असेही राजेंद्र राऊत यांनी आपल्या मनोगतात म्हटले.50000बार्शी तालुक्यातील विविध भागातील राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीचे भान ठेवत तसेच समतोल साधत नगरपरिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती व पंचायत समितीच्या विविध पदांमधून सर्वांना समान न्याय देण्याचे काम राजेंद्र राऊत यांनी केले असल्याची तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.

या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऍड. रणवीर राऊत, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, भाजप शहराध्यक्ष महावीर कदम, ग्रामीण तालुका अध्यक्ष बबन गडदे, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, उपसभापती बाबासाहेब गायकवाड यांच्यासह पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे नवनियुक्त सर्व सदस्य, भाजपचे विविध पदाधिकारी, बार्शी तालुक्यातील नेतेमंडळी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ऐतिहासिक विजयामुळे बार्शी तालुक्यात भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद आणि राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून आगामी काळात तालुक्यातील विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मिरगणे यांनी केले.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या