स्वराज्य माहिती अधिकार संघटनेच्या वतीने सर्व केशरी कार्ड धारकांना मोफत धान्य ध्यावेत अशी मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील रितसर मागणी केलेल्या सर्व केशरी कार्ड धारकांना अन्न सुरक्षा योजने अंतर्गत मोफत धान्याचा पुरवठा करावा अशी मागणी स्वराज्य माहिती अधिकार संघटनेच्या वतीने बार्शी चे तहसीलदार एफ. आर. शेख यांना देण्यात आले.
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे, संस्थापक तथा राष्ट्रीय मुख्य महासचिव कमलेश शेवाळे (देवा सर), विश्वस्त तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ. धनश्रीताई उत्पात यांचे सूचनेनुसार आणि सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक यांच्या आदेशानुसार सर्व विश्वस्त, सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी बार्शी तहसील कार्यालयात तहसीलदार एफ. आर. शेख यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
मागणीनुसार केसरी कार्ड धारकांना मोफत धान्याचा पुरवठा नक्की करू असे आश्वासन तहसीलदार शेख यांनी स्वराज्य शिष्ठामंडळास दिले आहेत. या प्रसंगी स्वराज्य चे बार्शी तालुका अध्यक्ष संतोष पंडित सोनार, तालुका संघटक अमोल सोनार, बार्शी शहर अध्यक्ष आकाश शहाणे, शहर उपाध्यक्ष स्वप्नील तातेड, शहर सहसचिव मकरंद शहाणे सह आदी सदस्य उपस्थित होते.





