बार्शीमहाराष्ट्रशैक्षणिक

सैनिक स्कूल परीक्षेत सुयशचे यश विद्यालयाचे पाच विद्यार्थी पात्र

सुयश विद्यालय बार्शी ची दैदिप्यमान कामगिरी – इयत्ता पाचवी सैनिकी स्कूल परीक्षेत ५ विद्यार्थी पात्र.

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : येथील सुयश विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवी सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेत विद्यालयातील पाच विद्यार्थी पात्र ठरून शाळेच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या परीक्षेत पात्र ठरलेले विद्यार्थी –

1.घोळवे शौर्य अंकुश-262/300

2.घोळवे ऋतुराज अंकुश-254/300

3.कापसे अनन्या विजय-252/300

4.अंधारे सात्विक संजय-244/300

5.सोनवणे वीरप्रताप सुर्यकांत-178/30050000या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि शिस्तबद्ध अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामागे विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन, नियोजनबद्ध सराव, तसेच पालकांचे सहकार्य यांचा मोठा वाटा आहे.

संस्थेचे संस्थापक शिवदास नलवडे ,संस्थेच्या मार्गदर्शिका सौ. प्रतिभा नलवडे विद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ.जगताप ,उप-मुख्याध्यापक संदीप येवले व सर्व मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे विद्यालयात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून इतर विद्यार्थ्यांनाही यापासून प्रेरणा मिळत आहे. सुयश विद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून शैक्षणिक गुणवत्तेसोबतच स्पर्धा परीक्षांमध्येही विद्यार्थी यशस्वी होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button