मधुबन ट्रॅक्टर्सतर्फे ग्राहकांसाठी ‘भव्य लकी ड्रॉ’ योजनेचा शुभारंभ; स्कुटी, टीव्हीसह अनेक आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी!
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शेती क्षेत्रातील नामांकित ‘जॉन डियर’ (John Deere) ट्रॅक्टर्सचे अधिकृत विक्रेते ‘मधुबन ट्रॅक्टर्स’ यांच्या वतीने ग्राहकांसाठी एक विशेष आनंदाची बातमी देण्यात आली आहे. मधुबन ट्रॅक्टर्सने आपल्या ग्राहकांसाठी ‘भव्य लकी ड्रॉ’ योजना जाहीर केली असून, यात सहभागी होणाऱ्या ग्राहकांना लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
या लकी ड्रॉ योजनेअंतर्गत प्रथम बक्षीस म्हणून आकर्षक ‘इलेक्ट्रिकल स्कुटी’ देण्यात येणार आहे. तसेच द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस फ्रिज, चतुर्थ बक्षीस २१ इंची एल.ई.डी. टीव्ही आणि पाचवे बक्षीस म्हणून कुलर देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक ग्राहकास हमखास भेटवस्तू देखील मिळणार आहे.
जॉन डियर ट्रॅक्टर्सच्या ५ वर्षांच्या वॉरंटीसह तंत्रज्ञानाचा लाभ घेतानाच ही बक्षिसे जिंकण्याची संधी ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून १००% पेमेंट झालेल्या ग्राहकांसाठीच ही योजना लागू असेल, असे व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी लातूर रोड, बार्शी येथील मुख्य कार्यालयाशी किंवा धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, परंडा, भूम, वाशी, कळंब, ढोकी, नळदुर्ग आणि वैराग येथील शाखांशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ७०५७७७७७५७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मधुबन ट्रॅक्टर्सतर्फे करण्यात आले आहे.





