महाराष्ट्रयोजनावाशिम

कारंजा येथे २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान समाज कल्याण योजनांचे मल्टिमिडिया छायाचित्र प्रदर्शन

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

वाशिम : जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्या सौजन्याने, दि. २५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कारंजा पंचायत समिती सभागृहात मल्टिमिडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मल्टिमिडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होणार असून, उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, तहसीलदार रवी महाले, सहाय्यक आयुक्त पियूष चव्हाण तसेच गटविकास अधिकारी मोहिनी राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.5000तीन दिवसीय या मल्टिमिडिया छायाचित्र प्रदर्शनामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती छायाचित्रे, माहिती फलक व दृकश्राव्य माध्यमांच्या साहाय्याने सादर करण्यात येणार आहे. अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांसाठी शिक्षण, स्वयंरोजगार, निवास व आर्थिक सहाय्य योजनांविषयी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नागरिक, अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच बचतगट सदस्यांनी या मल्टिमिडिया छायाचित्र प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे यांनी केले आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button