बांधकाम कामगारांनी नोंदणी व योजनांसाठी कोणालाही पैसे देऊ नयेत – कामगार विभागाचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

गोंदिया : कामगार विभागामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभ पूर्णपणे विनामूल्य दिले जात आहेत. या सर्व प्रक्रिया ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे पार पडत असून, अर्जांची तपासणी कर्मचारी व नोंदणी अधिकारी करतात. अर्ज मंजूर किंवा नामंजूर झाल्याची माहिती कारणासह संबंधित कामगारास एसएमएसद्वारे कळविण्यात येते.

मंडळाकडून देण्यात येणारे सर्व लाभ थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा केले जातात. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच कोणत्याही एजंट, दलाल, मध्यस्थ किंवा संघटनेमार्फत कामे केली जात नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नोंदणी, नुतनीकरण किंवा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली कोणीही पैसे, कमिशन किंवा लाचेची मागणी केल्यास कामगारांनी तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.50000प्रत्येक जिल्हा व तालुका कामगार सुविधा केंद्रांमध्ये यासंदर्भातील सूचना फलक लावण्यात आले आहेत. लाभाच्या अर्जानंतर कागदपत्र तपासणीसाठी कामगारांना निवडलेल्या तारखेला उपस्थित राहण्याची माहिती दिली जाते. तसेच लाभ विनामूल्य असल्याची स्पष्ट नोंद पत्रात नमूद केली जाते. लाचलुचपत संबंधित तक्रारीसाठी १०६४ या निःशुल्क क्रमांकावर किंवा acbwebmail@mahapolic.gov.in या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बांधकाम कामगार म्हणून पात्र असलेल्या कामगारांनीच नोंदणी करावी. नियोक्ता व ठेकेदारांनी त्यांच्या कामगारांना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपरिषद किंवा नगरपंचायत यांच्या अधिकृत अधिकाऱ्यांनी पात्र कामगारांनाच प्रमाणपत्र द्यावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. सहायक कामगार आयुक्त रा. मो. धुर्वे यांनी कामगारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता थेट अधिकृत मार्गानेच अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या