बार्शी डाकघर येथे मोठ्या उत्साहात शिवविचारातून साजरी केली शिवजयंती
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने सामूहिक शिवविचारातून बार्शी डाकघर येथे एकत्व पालक हुशार व गरजू पाच शिवकन्यास प्रत्येकी 5 000 रुपये एफडी करून पोस्टाचे पासबुक त्यांच्या सहपाल्यास देऊन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली 19 फेब्रुवारी 2026रोजी सकाळी ठीक अकरा वाजता बार्शी येथील पोस्ट ऑफिस मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी पोलीस उपनिरीक्षक धनाप्पा शेटे, सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट नितीन सोडळ बार्शी पोस्ट मास्तर उल्हास सुतार, डाकघर जनसंपर्क निरीक्षक राहुल जाधव, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी हे लाभले प्रथम दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोशात अभिवादन करण्यात आले.
या जयंतीनिमित्त संस्थेचे सहसचिव नागनाथ सोनवणे यांनी तुमच्या माझ्या जीवनामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी विचारांची पेरणी केली अशा सर्व महापुरुषांना अभिवादन करून संस्थेचे उद्दिष्ट व पुढील काळात होणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली याप्रसंगी राहुल जाधव यांनी छत्रपती शिवाजी व संस्थेबद्दल माहिती दिली राहुल वाणी यांनी ही संस्थेबद्दल माहिती देऊन या उपक्रमामध्ये ज्या ज्या लोकांनी अर्थसहाय्य केले अशा सर्वांचे आभार व्यक्त केले.
बार्शी पोलीस उपनिरीक्षक धनाप्पा शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग व सध्या बार्शी शहरातओन्ली समाजसेवा वेगवेगळे उपक्रम राबवून समाजसेवा करतात या शिवजयंती निमित्त पुढील काळात त्यांच्या संस्थेकडून समाज उपयोगी कार्य घडो असे उद्गार काढले रयतेचे राजे,जाणता राजा बारा बोलोते दार व अठरा पगड जातींना घेऊन स्वराज्य निर्माण करणारे सर्व जाती-धर्माचे आदर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करून मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी 5 000 रुपये एफडी केलेली डाकपासबुक खाते पाच शिवकन्यांना देण्यात आले.
1) कु. स्वरा शंकर शिंदे यशवंतराव चव्हाण नगरपरिषद शाळा क्रमांक 15 2) कु. कादंबरी सचिन माने , कन्या प्रशाला बार्शी 3) कु. सरस्वती दिलीप वाघमारे न्यू हायस्कूल कुसळंब तालुका बार्शी 4) कु निशा कैलास जानराव प्रॅक्टिसिंग स्कूल बार्शी 5) सोनाली दिलीप निंबाळकर छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक एक
याप्रसंगी अध्यक्ष राहुल वाणी, सचिव अजय तिवारी, उपाध्यक्ष संतोष शेळगावकर, सहसचिव नागनाथ सोनवणे, खजिनदार मानकोजी ताकभाते, सुनील फल्ले सुरेंद्र स्वामी भरत जाधव रतिकांत हमने सर प्रतीक खंडागळे दत्तात्रेय कांदे अतुल वाणी नगरसेविका सायरा मुल्ला मॅडम रेखा विधाते रागिने झेंडे सुजाता अंधारे कोमल वाणी अनुसया आगलावे माधुरी वाणी रेखा सरवदे, आशादेवी स्वामी, त्रिशाला मिसाळ अरुणा शेळगावकर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सचिव अजय तिवारी यांनी शिवजयंती निमित्त पोस्ट खात्यातील सर्व स्टाफ महिलावर्ग शिवप्रेमी पत्रकार संस्थेतील सर्व सन्माननीय पदाधिकारी हजर राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.





