छत्रपती ग्रुपच्या शिवजयंती उत्सव अध्यक्षपदी बापूसाहेब पवार; शिवसृष्टी येथे नियोजनाचा श्रीगणेशा अजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी जाहीर; सामाजिक कार्यास गती देण्याचा निर्धार

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

बार्शी : शिवसृष्टी परिसरात ‘छत्रपती ग्रुप’च्या वतीने शिवजयंती २०२६ च्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. अजय पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत आगामी वर्षभरातील सामाजिक उपक्रम आणि शिवजयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी बापूसाहेब पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

या बैठकीत संघटनेच्या विस्तारासाठी आणि सामाजिक कार्याला अधिक ताकद देण्यासाठी नवीन निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये उपाध्यक्षपदी चिकू डाके तर कार्याध्यक्षपदी सचिन शिंदे यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे ग्रुपमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, अजय पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सामाजिक कार्याची नवी ऊर्जा:छत्रपती ग्रुप हा सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला आहे.5000नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून तरुणांना समाजकार्याची संधी उपलब्ध करून देणे आणि संघटना अधिक बळकट करणे हा या निवडींमागचा मुख्य उद्देश आहे. “अजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या जोमाने यंदाची शिवजयंती व वर्षभरातील सामाजिक कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवले जातील,” असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.या बैठकीस ग्रुपचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सदस्य आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या