श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते शासकीय पुजा संपन्न

0

भीमाशंकर महोत्सव आयोजन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा मानस

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

पुणे : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात विधिवत शासकीय पूजा करुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. येत्या काळात परिसरातील नागरिकांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्यादृष्टीने येत्या काळात ‘भीमाशंकर महोत्सव’ आयोजन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उप विभागीय अधिकारी अनिल दौडे, मंदिर समितीचे पदाधिकारी, स्थानिक प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डुडी म्हणाले, देशातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराच्या दर्शनासाठी मोठ्याप्रमाणात भाविक येत असतात. आगामी काळात नाशिक येथे कुंभमेळा होणार असून त्याचा विचार करता मंदिराच्या विकासासोबतच परिसरातील रस्ते,पाणी पुरवठा, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प ‘एसटीपी’ ची कामे करण्यात येत असून ती लवकरच पूर्ण होतील, अशा विश्वास डुडी यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले मंदिर परिसरातील विकासकामाकरिता ९ जानेवारी ते ९ एप्रिल २०२६ या कालावधीत भविकांची सुरक्षितता विचारात घेता मंदिर बंद ठेवण्यात आले आहे, कामाची पाहणी केली असता दर्जेदार पद्धतीने विकासकामे होत असून ९ एप्रिलपर्यंत मुख्य मंदिराचे काम पूर्ण होईल व त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे, जरी मंदिर बंद असले तरी श्री भीमाशंकराची दैनंदिन नियमित पूजा होत आहे, त्यामुळे भाविकांनी सहकार्य करावे,असे आवाहन डुडी यांनी केले.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या