महाराष्ट्रमुंबई

निवृत्त मुख्याध्यापक व्यंकटेश कुलकर्णी यांची ‘प्रतिबिंब’ प्रतिष्ठानला देणगी

B1न्यूज मराठी नेटवर्क 50000

मुंबई, दि. १५ : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्य मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणा व आश्रयाने पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘प्रतिबिंब’ प्रतिष्ठानला बार्शी तालुक्यातील ठोंगे उपळाई (जि. सोलापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक व्यंकटेश कुलकर्णी यांनी दहा हजार रुपयांची देणगी दिली.

बार्शी येथे पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात अ. भा. नाट्य परिषदेच्या बार्शी शाखेचे अध्यक्ष व कवी सोमेश्वर घाणेगावकर, ज्येष्ठ पत्रकार सचिन अपसिंगकर आणि अनिल जोशी यांच्या उपस्थितीत कुलकर्णी यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र व ‘प्रतिबिंब’ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने तसेच कोषाध्यक्ष दिपक नलावडे यांच्याकडे देणगीचा धनादेश सुपूर्द केला. पत्रकारांच्या कुटुंबासाठी प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेल्या उपक्रमांमुळे प्रभावित होऊन, तसेच ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेने ही देणगी दिल्याचे कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या उत्स्फूर्त योगदानाबद्दल कोषाध्यक्ष दिपक नलावडे यांनी आभार व्यक्त केले.

‘प्रतिबिंब’ प्रतिष्ठानच्या वतीने आतापर्यंत पत्रकारांच्या मुला-मुलींच्या शिक्षण व करिअरसाठी ‘चंद्रकांतदादा शिष्यवृत्ती’ योजना राबविण्यात येत असून, वैद्यकीय मदतीसह विविध उपक्रमांद्वारे सुमारे १६ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button