मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत द्यावी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक -2026 होणाऱ्या क्षेत्रात मतदानाच्या दिवशी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या क्षेत्रात असलेल्या मतदारांना मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत मा. कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे दि 30 जानेवारी 2026 रोजी च्या परीपत्रकान्वये कळविले आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी दोन तासाची सवलत हि उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने दुकाने इत्यादीना लागू राहील.

सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर सोलापूर जिल्हयातील खाजगी कंपन्या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे नाटय गृहे व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादीना सुचना देण्यात येत आहे कि, दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदानाच्या दिवशी कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी.

जर अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक आहे.

तरी सोलापूर जिल्ह्यातील कामगारांकरीता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सोलापूर यांच्या स्तरावर दक्षता कक्ष स्थापन करण्यात आले असून कामगारांना मतदानाकरीता सुट्टी अथवा दोन तासांची सवलत आस्थापना मालक देत नसल्यास कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक 0217-2728401 वर संपर्क साधून तक्रार करावी असे अतिरिक्त सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले यांनी आवाहन केले आहे.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या